ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

Big Breaking: राष्ट्रवादीत हडकंप…शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा 

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आक्रोश,चव्हाण सेंटर मध्येच बसले आमरण उपोषणाला..

मुंबई,( प्रतिनिधी)   महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत मी आहे. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभव दाखवला नाही. 63 वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील 56 वर्ष सत्तेत आहे,” असं शरद पवारांनी सांगत  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली..

शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली.कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

“मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली. 

पुढे त्यांनी सांगितलं की “मी निवृत्ती जाहीर करत असलो तरी शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा आणि सांस्कृतिक यामध्ये अधिक काम करण्याचा मानस आहे. तसंच युवक, युवती, विद्यार्थी यांना अधिक प्रोत्साहित करत समाजातील कमकुवत घटकाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मी अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये काम करतो. या सर्व संस्थांमध्ये मी पदाधिकारी आहे. हे काम मी असंच सुरु ठेवणार आहे. वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अधिक वेळ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने मला खंबीरपणे साथ दिल्याचं मी विसरु शकणार नाही”.

दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. नवीन समितीच अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल, असे सभागृहात शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!