
सिंधुदुर्ग दि.5 (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गालगत निवसर जवळ जाळण्यात आलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे रेल्वे वाहतुकीवर आज काही काळ परिणाम झाला.
रेल्वे मार्गालगत निवसर जवळ जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर लगतच्या रेल्वे बोगद्यात पसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डाऊन मंगला तसेच अप सावंतवाडी दिवा एक्सप्रेससह याचवेळी या मार्गावरून धावणाऱ्या सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांना विलंबाचा फटका बसला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. दरम्यान, दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास खोळंबेली वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले घटनास्थळावरून मंगला एक्सप्रेस जात होती. धुराची झळ बसल्याने मंगला एक्सप्रेससह त्याचवेळी त्या भागातून अप दिशेने जाणारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस देखील अडकून पडली. या दोन गाड्यांच्या पाठोपाठ दोन्ही बाजूंनी येणाऱ्या अन्य चार एक्सप्रेस गाड्यांना याचा फटका बसला.