गोरेगाव मिररआपला जिल्हामनोरंजनमुंबई

शिवसेना ठाकरे पक्षातर्फे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात भव्य कोकणी मालवणी जत्रा

आ. रविंद्र वायकर यांच्या आयोजनाखाली १८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार जत्रा..

 मुंबई (महेश पावसकर) : दिपावलीनिमित्त आरेतील आदिवासी बांधव-भगिनी तसेच दिव्यांग यांच्या समवेत दिवाळी साजरी केल्यानंतर जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर (उद्धव ठाकरे गट) यांच्या आयोजनाखाली १८ ते २७ नोव्हेंबर रोजी भव्य कोकणी- मालवणी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता येथील शामनगर तलाव या ठिकाणी १८ नोव्हेंबरला या जत्रेचा शुभारंभ सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे.

या जत्रेत विविध प्रकारच्या खेळण्याचा समावेश असल्याने त्याचा बच्चे मंडळींना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. त्याचबरोबर कोकणी व मालवणी पदार्थांचे स्टाॅल्स व अन्य शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे स्टाॅल्सही असणार आहेत. जत्रेच्या उद्घाटना दिवशीच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी तर्फे गणेश कला मंच प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकमेळा. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खास कोकणातून आलेल्या विविध दशावतार नाट्य मंडळांचे प्रयोग दरदिवशी जोगेश्वरीतील रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

जत्रेच्या समारोपा दिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबरला जोगेश्वरी भुषण पुरस्काराचे वितरण, घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, जोगेश्वरीतील विजयी प्रो गोविंदा पथकाचा सन्मान सोहळा पार असणार आहे. सलग १० दिवस चालणाऱ्या या जत्रेचा जोगेश्वरी बरोबरच मुंबईतील कोकणी व मालवणी पदार्थाच्या खाद्य प्रेमींनी तसेच दशावतार नाटकांच्या रसिक प्रेक्षकांना या जत्रेचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!