क्रीडा

विराट कोहली लंडनला पोहोचताच अनुष्का शर्मा हिने शेअर केला खास फोटो

लंडन- T20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली हा भारतामध्ये दाखल झाला. वानखेडे स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो आपल्या टीमसोबत उपस्थित होता. मात्र, त्यानंतर गुरूवारी रात्री विमानतळावर विराट कोहली स्पॉट झाला. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लगेचच विराट कोहली हा लंडनकडे रवाना झाला. यावेळी विराट कोहली याचे मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अनुष्का शर्मा हिने मुलगा अकाय याला लंडनमध्येच जन्म दिलाय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच स्थायिक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून तशी चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील अनुष्का शर्मा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा ही दिसते. भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर एक अत्यंत खास अशी पोस्ट शेअर केली होती.

अनुष्का शर्मा हिने आता नुकताच एक अत्यंत खास असा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. अनुष्का शर्मा हिने नाश्त्याच्या प्लेटचा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे चार प्लेट दिसत आहेत. ब्लॅकबेरी, चेरी आणि स्ट्रॉबेरी हे दिसत आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिसत आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याची चर्चा असताना विराट किंवा अनुष्का यांनी कोणीच यावर भाष्य केले नाहीये. मध्यंतरी एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. त्या फोटोमध्ये विराट कोहली आणि वामिका एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत होते. व्हायरल होणारा फोटो मागच्या बाजूने काढलेला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र, त्यांनी मुलाचा फोटो शेअर केला नाही. हेच नाहीतर मुलगी वामिका हिचा देखील एकही फोटो किंवा व्हिडीओ विराट आणि अनुष्काने शेअर केला नाही. काही दिवसांपूर्वी एक फोटो अनुष्काने शेअर केला होता. त्यामध्ये दोन पेंटिंग काढण्यात आल्या होत्या. एका बाजूला अनुष्काचे नाव होते तर दुसऱ्या बाजूला वामिकाचे नाव होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!