करूळ घाटाकडे पालकमंत्र्यांचा कानाडोळा ? पहाणी न करताच थेट मुंबईला गेले

वैभववाडी – करूळ घाटाचे झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम हा मुद्दा सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गाजत असताना गेल्या आठवड्यात दौऱ्यावर असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी कानाडोळा केला आणि ते मुंबईकडे निघून गेले ?अशी नाराजी सर्वत्र ऐकायला मिळत आहे.त्यामागचे नेमके गौडबंगाल काय ?असा सवाल ऐकायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने करूळ घाटाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.त्याचे कामही सुरु झाले.पण “भीक नको पण कुत्रा आवर “अशी स्थिती करूळ घाटाच्या कामाची झाली आहे.पूर्वी जो घाट होता तो बरा होता,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.या प्रकरणी उद्या बुधवारी
वैभववाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
निकृष्ट दर्जाचे काम : करूळ घाटाचे जे काही काम झाले आहे.ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे.ते कधीही कोसळेल अशी भीती करूळ गावचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.त्या कामासाठी लोखंडी सामान,सिमेंट,खडी,वाळू तसेच जे काही तंत्रज्ञान लागते ते योग्य पद्धतीने वापरले गेलेले नाही त्यामुळे काँक्रीट झालेले काम कोसळू लागले आहे.काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने वाहून गेले.गेले काही महिने घाट बंद आहे.त्यामुळे वैभववाडीतील व्यवसायीकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काहींनी आपला हॉटेल व्यवसाय बंद केला आहे,असे सांगितले जाते.
पालकमंत्र्यांनी असा काय केला ? : गेल्या आठवड्यात पालक मंत्री रवींद चव्हाण हे जिल्हा नियोजनच्या बैठकीला आलेले होते.त्यावेळी ते जनतेच्या प्रश्नावर गंभीर झालेले दिसले पण सध्या करूळ घाटाच्या बांधकाम प्रकरणी कंत्राटदार लोकांच्या जीविताशी खेळत आहे.गेल्या काही दिवसात तीन वेळा घाटतील बांधकाम कोसळण्याच्या घटना घडल्या.या बाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी ऐकायला मिळत आहे.अशी परिस्थिती असताना पालक मंत्र्यांनी त्याकडे कानाडोळा केला आणि ते थेट मुंबईकडे गेले अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.पालकमंत्र्यांनी असं काय केलं ?
ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यालयाचे ते राज्यातील प्रतिनिधी आहेत.त्यांनी आपली जबाबदारी का टाळली ?जनेतला विश्वास का नाही दिला ? अशी तीव्र नाराजी वैभववाडीत ऐकायला मिळत आहे.