एक महिन्यामध्ये केंद्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडणार – जयंत पाटील
पाटील यांच्या राजकीय वक्तव्यामुळे मोठी खळबळ

मुंबई – एक महिन्यामध्ये केंद्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडणार आहेत. त्यासाठी शरद पवार हे दिल्लीत आहेत. असा मोठा राजकीय गौफ्यस्फोट शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या राजकीय वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पंढरपुरात दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे.
अधिवेशाच्या उदघाटनाला शरद पवार येणार होते. परंतु अचानक दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने शरद पवार दिल्लीला गेल्याचेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे 19 वे राज्यस्तरीय अधिवेशनाला आज सुरवात झाली. अधिवेशनाचे उदघाटन दिपांकर भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले.
स्वागतपर भाषणात बोलताना जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापने पासून ते आज पर्यंतचा इतिहास सांगितला. अलीकडेच झालेला विधान परिषद निवडणुकीतील पराभावर भाष्य करत काँग्रेसवर ही त्यांनी निशाणा साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाला अनेक वर्षाचा राजकीय इतिहास आहे.