राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ ग्रंथाचे प्रकाशन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 'उत्कृष्ट संसदपटू' व 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांच वितरण

मुंबई – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘उत्कृष्ट संसदपटू’ व ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचा वितरण समारंभ आज दि.३ सप्टेंबर रोजी मुंबईतील विधिमंडळातील सभागृहात पार पडला.
महाराष्ट्र विधान परिषद शतकमहोत्सव कार्यक्रम निमीत्ताने महामहिम राष्ट्रपती यांना पैठणी साडी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.तसेच मुख्यमंत्री आणि दोन ही उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपती यांना छ. शिवाजी महाराज यांची मुर्ती देऊन त्यांच स्वागत केलं. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांच्या भाषणाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकारने सुरवात केली, महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मु यांनी केले.
यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे.
ही खूप आनंदाची बाब आहे की सध्याच्या काळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेतील महिला परंपरेला पुढे घेऊन जात आहे,तसेच ही महिला उपसभापती असणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. असे गौरव उद्गार यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल काढले.
महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी केलं.
श्रीमती मुर्मु या देशाच्या दुस-या महिला राष्ट्रपती आहे,त्या या ठिकाणी उपस्थित राहणं हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, त्यांच जीवन मोठ संघर्षमय राहीलेल आहे.असे यावेळी भाषण करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला याच दुःख प्रत्येक भारतीयांना आहे त्याप्रमाणे मला ही आहे, मात्र शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हदयात राहतील ,शेवटच्या श्वासापर्यंत ते हदयात राहतील. असे प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या प्रकाशित झालेल्या ग्रंथात महाराष्ट्र विधान परिषद विधान परिषदेतील प्रतिष्ठित माननीय आजी व माजी सदस्यांचे भाषण व लेख सामील आहेत. जे या साहित्याची उंची वाढवतात.असे यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.तसेच आतापर्यंतच्या शतक महोत्सव वर्षा पर्यंत विधानपरिषदेने एकूण २७८ सत्र आयोजित केले आहे. अशी माहिती यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.
महाराष्ट्र विधीमंडळ हे देशांतील सर्वात प्रीमीयम बाॅडी मानली जाते,ही परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्व सदस्य नेहमी प्रयत्न करत असतात, असे यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे १९९५ पासून दोन्ही सभागृहांच्या आमदारांना प्रत्येक वर्षासाठी ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावर्षी गेल्या ५ वर्षातील ५३ पुरस्कारांचे वितरण माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले.
या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थिती होते. यावेळी मंत्रीमंडळातील सदस्य, तसेच माजी आजी सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात आणि सांगता राष्ट्गीताने करण्यात आली.