राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला

मुंबई – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना ठोकरले.पण बावनकुळेंच्या मुलावर अद्याप कारवाई केली नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे ? अशा प्रश्नांची सरबत्ती प्रदेश काँग्रेसने मंगळवारी सरकारवर केली. भाजप युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार,खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच राहिलेला नसून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. यासंदर्भात बोलताना प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की,नागपुरात ऑडी कारने तीन-चार लोकांना ठोकरले ती कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचीच असून अपघातानंतर कारच्या नंबर प्लेट्स काढून कारमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसले म्हणजे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गंभीर आरोप लोंढे यांनी केला.





