महाराष्ट्र
राज्यातील तापमानात मोठी घट, गारवा वाढला, पुढील 2-3 दिवस चित्र कायम राहणार

मुंबई- सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडल्याचं चित्र आहे. राज्यातील कमाल तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राज्यात चांगलाच गारठा वाढला आहे आणि पुढील २-३ दिवस हे चित्र कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज सकाळपासून राज्यातील तापमानात मोठी घट झाली असून महाबळेश्वरमध्ये ८ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर आज सकाळी मुंबईत १६ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. अश्यात उत्तर महाराष्ट्र,विदर्भ आणि कोकणातही कडाक्याची थंडी पडली आहे.यातच आजची दुपारही राज्यातील नागरिकांसाठी अंगात थंडी भरवणारी ठरत आहे.
हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात सध्या थंडी वाढली आहे.दरम्यान मुंबईमध्येही आज अनेक जण स्वेटर परिधान करून फिरताना दिसत आहे.हेच चित्र पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.