आजपासून मुंबईत ७ जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू

मुंबई:- राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.अश्यातच देशासमोर ओमायक्रॉनचं संकट आ वासून उभं आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत मुंबईत ७ जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या पार जाताना पाहायला मिळत आहे. ही चिंताजनक बाब पाहता नवीन वर्षाच्या धर्तीवर कुठेही गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,म्हणून आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग सतर्क झाला आहे.मुंबई महानगरपालिकेनेही कंबर कसून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू केली आहे.
राज्यातही लागू होऊ शकते जमावबंदी:-
देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक आहेत.अश्यातच कोरोना बाधितांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.हे सर्व पाहता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील निर्बंध कडक करण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे राज्यातही निर्बंध कडक होण्याची चिन्ह दिसत आहेत.