महाराष्ट्रमुंबईसाहित्यिक
अंबाजोगाई आता ‘कवितांचे गाव’ होणार -उदय सामंत ह्यांची घोषणा

मुंबई : आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेल अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पुढील दोन महिन्यांत ही अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे, असे बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी जाहीर केले.
विशेष वैशिष्ट्ये
* गावात पाच ठिकाणी कवितांची दालन सुरू होणार
* कवितांचे संस्कार आणि साहित्यिक वारसा जपण्याचा अनोखा उपक्रम
* विवेक सिंधू हे पुस्तक सर्वदूर पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न
याप्रसंगी खासदार संदिपान भुमरे, दीपाताई क्षीरसागर संजय पाटील देवळाणकर, आनंद कराड, अंबाजोगाई येथील राज किशोर मोदी, प्रभाकर साळेगावकर, सतीश साळुंखे, बाळासाहेब पठारे, महेश वाघमारे तसेच अतुल कुलकर्णी आधी साहित्यिकांची प्रमुख उपस्थिती होती.