स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला,हा अभिनेता दिसणार दिसणार मुख्य भुमिकेत

मुंबई- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. हा सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक असणार आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाची ही दुसरी बायोपिक असेल. याआधी त्यानं सरबजीत या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक जून २०२२ मध्ये प्रदशित होणार आहे.
इंस्टाग्रामवर बातमी शेअर करताना रणदीपने एक पोस्ट शेअर केली आहे.यात त्याने ‘कुछ कहानी बताई जाती है और कुछ जी जाती हैं!’ (काही कथा सांगितल्या जातात आणि काही जगल्या जातात). स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकचा भाग बनल्याबद्दल कृतज्ञ, उत्साहित आणि सन्मानित आहे’,असं म्हटलं आहे.
विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त सावरकरांसोबतच इतरही स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित या बायोपिकची घोषणा केली गेली आहे. फ्रीडम फायटर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपट बनणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.
सावरकरांचा जन्म १८८३ मध्ये महाराष्ट्रात झाला.सावरकर स्वतः लेखकही होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांवर इंग्रजांनी निर्बंध लादले होते. त्यात १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचाही समावेश होता. पण सर्व प्रयत्न करूनही ब्रिटिशांना ते नेदरलँड्समधून (१९०९ मध्ये) प्रकाशित होण्यापासून रोखता आले नाही.
त्यांनी एकूण 38 पुस्तके लिहिली जी प्रामुख्याने मराठी आणि इंग्रजी भाषेत होती. त्यांची ‘हिंदुत्वः हू इज हिन्दू’ ही पुस्तिका खूप गाजली होती.हिंदू राष्ट्रवादाचा प्रचार करणाऱ्या वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन करते वेळेस महेश मांजरेकर यांनी वक्तव्य केले की, ‘त्यांना वीर सावरकरांच्या जीवन आणि त्यांच्या योगदान कार्याबद्दल नेहमीच आकर्षण होते,ते एक असे व्यक्तीमत्त्व आहेत. ज्यांना इतिहासात त्यांचे हक्क मिळाले नाही. एक दिग्दर्शक म्हणून हे एक आव्हान आहे. पण मला ते आव्हान स्वीकारायचे आहे हिंदुत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद भारतीय राजकारणात केंद्रस्थानी आल्यापासून ते सार्वजनिक प्रवचनाच्या केंद्रस्थानी आहेत’.