कोकणातील विद्यार्थीनीनं अवघ्या ६०० रूपयात आत्महत्या रोखणारं यंत्र बनवलं

वाटूळ- नैराश्यातून अनेक जण आत्महत्येच्या आहारी जातात.या ना त्या कारणावरुन आत्महत्या करणाऱ्यांची प्रकरणं आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात.पण या आत्महत्येचा मनस्ताप आत्महत्या करणाऱ्यांच्या मागे कुटुंबाला सहन करावा लागतो.हे सर्व पाहता आत्महत्या रोखण्यासाठी कोकणातील एका शालेय विद्यार्थिनींनं एक यंत्र तयार केलं आहे.
या यंत्राला ‘एसपी हुक’ असं नाव देण्यात आलं आहे.या यंत्राला राज्यस्तरीय इंस्पायर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे यंत्र विद्यावर्धिनी मुंबई संचलित निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडये व इंद्रनील तावडे कला व वाणिज्य महाविद्यालय या शाळेत शिकणाऱ्या रिया दीपक लाड या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बनवले आहे.
असं काम करतं हे यंत्र:-
हे यंत्र अत्यंत उपयोगी पडणारे व सहज उपलब्ध होणारे आहे.हे यंत्र तयार करण्यासाठी या विद्यार्थिनीला फक्त ६०० रुपये खर्च आला आहे.हे यंत्र वाहतूक विरहित आहे. हे यंत्र आत्महत्या रोखण्यास फायदेशीर ठरतं.फॅनवरील आत्महत्या रोखण्यास हे यंत्र सक्षम आहे.कमीत कमी ५ किलो इतकं वजन वाढल्यास हे यंत्र कार्यान्वित होतं. यंत्रावरील टेन्शन स्प्रिंगच्या साहाय्याने हे यंत्र नियंत्रित केले आहे. तसेच त्याला वापरलेल्या पुलीला गियर बसवून त्याचे फिरणे मंद गतीने नियंत्रित केलेले आहे.त्यामुळे दोराच्या साहाय्याने खाली येणारा फॅन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात पडू शकत नाही.फॅन अलगद खाली येऊन थांबतो.अश्या प्रकारे व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.