कोंकणमहाराष्ट्र

इन्स्टाग्रामवरील ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार; राजीवड्यातील तरुणास पोलीस कोठडी

रत्नागिरी :- इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर ४ महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रत्नागिरी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजीवडा येथील संशयित तरुणाला शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उजैफ वस्ता (२०,रा.राजीवडा रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिची संशयित उजैफबरोबर इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.

या ओळखीचा फायदा घेत उजैफने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाणही केली होती. याप्रकरणी पीडितेने गुरुवार ६ जानेवारी रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उजैफ विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!