महाराष्ट्रमुंबई

परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती ‘महाराष्ट्र’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याची देशपातळीवर आघाडी: २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

मुंबई : महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च 2025) शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील 10 वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मागील दशकातील परकीय गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांमध्ये) :

2015-16 : 61,482 कोटी

2016-17 : 1,31,980 कोटी

2017-18 : 86,244 कोटी

2018-19 : 57,139 कोटी

एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी

2020-21 : 1,19,734 कोटी

2021-22 : 1,14,964 कोटी

2022-23 : 1,18,422 कोटी

2023-24 : 1,25,101 कोटी

2024-25 : 1,64,875 कोटी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!