अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकणार विवाहबंधनात,तिचा प्रियकर आहे हिंदीतील आघाडीचा दिग्दर्शक,पहा फोटो

मुंबई:-मराठी मालिका विश्वात अभिनेत्रींच्या यादीत आघाडीवर असलेलं नाव म्हणजे हृता दुर्गुळे.मराठी मालिका विश्वात अभिनेत्री हृता दुर्गुळे तिच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. फुलपाखरू मालिकेपासून ते आताच्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेपर्यंत तिने आपला मोठा चाहता वर्ग मराठी कलाविश्वात तयार केलाय.हीच हृता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली स्वतः हृताने फोटो शेअर करत दिली.यानंतर हृताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.अश्यातच आता पुन्हा एकदा तिने मेहंदी काढून एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय.आणि त्याला ‘साखरपुडा’ असा कॅपशन दिलाय. हृताने शेअर केलेला हा फोटो सध्या हृताच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
अभिनेत्री हृता ही हिंदी मालिका तसेच सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाह याच्या सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा शाह यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.तर दिग्दर्शक प्रतीक शाहने अनेक मालिकांसाठी आणि सिनेमांसाठी दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.