मनोरंजन

अभिनेत्री प्रिया राजवंश हत्या, देवा आनंदच्या पुतण्यांना जन्मठेप

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या वहिदा रहमान आपल्या फिल्मी करिअरसाठी जितक्या प्रसिद्ध होत्या तितक्याच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यसाठीही चर्चेत होत्या. मात्र वहिदा रहमानच्या पती आणि मुलांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वहीदा रेहमानचे अभिनेत्री प्रिया राजवंशसोबतही संबंध होते हे फारच लोकांना माहीत असेल. वहिदा रेहमान यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांना पद्मभूषण, पद्मश्री आणि दादासाहेब फाळके यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अभिनेत्री कधीच बनायचे नव्हते परंतु नशिबाने त्या या अभिनयाच्या क्षेत्रात आल्या अन् इथेच त्यांची एका व्यक्तीशी गाठभेट झाली.

कमलजीत हे ६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक ‘शगुन’, ‘तमाचा’, ‘हीर रांझा’, ‘मिस्टर इंडिया’ ‘सन ऑफ इंडिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.गुरु दत्तसोबतचे नाते तुटल्यानंतर वहिदा रहमान आणि कमलजीतचे अफेअर सुरू झाल्याचे बोलले जाते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर वहिदा रहमान आणि कमलजीत यांनी लग्न केले. मात्र त्यांच्या लग्नात अनेक अडथळे आले. वहिदा रहमानने कमलजीतबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगितले तेव्हा त्यांनी ते नाकारले. मात्र वहिदा रेहमान यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन १९७४ मध्ये कमलजीतसोबत लग्न केले. लग्नानंतर वहिदा रहमान आणि कमलजीत यांना सोहेल आणि काशवी ही मुलं झाली.

२००० साली कमलजीतचा मृत्यू झाला. कमलजीत हे अभिनेत्री प्रिया राजवंशचा भाऊ होते. प्रिया राजवंशने देव आनंदचा भाऊ आणि चित्रपट निर्माता चेतन आनंदसोबत लग्न केले. चेतन आनंदचे आधीच विवाहित होते, पण तरीही ते प्रिया राजवंशच्या प्रेमात पडले. त्यांना केतन आनंद आणि विवेक आनंद ही दोन मुलेही होती.केतन आणि विवेक आनंद हे देव आनंदचे पुतणे होते आणि त्यांच्यावर प्रिया राजवंशच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणी त्यांना जुलै २००२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना जामीन मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!