अभिनेत्री सुष्मिता सेनने पोस्ट लिहित रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपवर केला खुलासा

मुंबई :- अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल मागच्या अनेक काळापासून एकमेकांसोबत राहत आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शॉपिंग असो, इव्हेंट्स असो किंवा व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांचं प्रेम पाहून चाहते खूप खुश होत असतात. दोघांच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या.
मात्र, मागच्या काही दिवसांपासून या दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा चित्रपट सृष्टीत होताना दिसून येत होती. आता सुष्मिता सेनने तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडले आहे. अभिनेत्रीने रोहमन शॉलसोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या वृत्ताला योग्य ठरवत सांगितले की, ‘तिचे आणि रोहमन शॉलचे नाते फार पूर्वी संपले आहे. मात्र त्यांच्यातील प्रेम आजही कायम आहे’.
सुष्मिता सेनने ब्रेकअपच्या चर्चेला दिला-
दुजोरा सुष्मिता सेनने रोहमन शॉलसोबतचा तिचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही सेल्फीसाठी पोज देत आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले, आम्ही मित्रच राहिलो. नातं खूप आधी संपलं…आता फक्त प्रेम राहिलं…❤️ सुष्मिता सेन-रोहमन शॉलचा Break Up
15 वर्षांनी लहान होता अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड-
सुष्मिता सेनने तिच्या पोस्टमध्ये #nomorespeculations #liveandletlive #cherishedmemories #gratitude #love #friendship असे हॅशटॅग वापरले आहेत. सुष्मिता सेनची ही पोस्ट तिची आणि रोहमनची चांगली मैत्री असल्याचे सिद्ध करते. त्यांचे नाते संपले असेल पण दोघांमधील प्रेम अजूनही कायम आहे. जे नेहमी असेल असे तिच्यापोस्टमधून दिसून येते.