कुडाळ मधील पिंगुळी गावात सापडली ‘आफ्रिकन गोगलगाय’

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात आफ्रिकन गोगलगाय आढळून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आफ्रिकन स्नेहलची ही पहिलीच नोंद झाली आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावंडे यांनी दिली आहे. आफ्रिकन स्नेल ही जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातीपैकी एक मानली जाते. ही साधारणतः ही प्रजाती १०-१५ सें मी पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वात मोठे स्थलांतरित गोगलगाय पैकी ती एक आहे.
ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एकावेळी १०० ते ४०० अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते. माती, झाडे, शेतीमाल, वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलद गतीने ती सगळीकडे पसरते. एकदा नवीन जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचे वर्चस्व निर्माण करते विशेषत पाने, कोवळी, फांदी, फळे व मुळे यावर हल्ला केल्याने पिकातून मिळणारे एकूणच उत्पन्न ढासळण्याची शक्यता दाट असते.