इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्ययामुळे चिपी विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली.

मुंबई: इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्यामुळे चिपी सिंधुदुर्ग विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पूर्ण प्रवासी क्षमतेने उड्डाणे होत असून जादा विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
इंडिगो विमान कंपनीच्या व्यत्ययामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात सध्या अभूतपूर्व गोधळ निर्माण झाला आहे. कित्येक विमानफेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांनी अन्य विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे. त्याचा फायदा चिपी विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवांना झाला आहे. चिपीहून सद्यस्थितीत ‘फ्लाय ९१’ कंपनीकडून पुणे, बेंगलोर व हैदराबादकरिता नियमित विमानसेवा सुरू आहे. अन्य वेळीही या सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असता. त्यातच सध्या सुरू असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या गोंधळामुळे चिमी विमानतळावर येणारी विमाने पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून चिपी विमानतळावर दिवसभरात ४२० प्रवासी दाखल होत असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली तिन्ही शहरांतून येणाऱ्या विमानांच्या तिकिटांची नोंदणी शंभर टक्के होत आहे. त्यामुळे कंपनीन हैदराबाद व बेंगलोरहून चिपीकरिता अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच पुणे येथून येणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





