क्राइमब्रेकिंगमुंबई

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या दगडफेक प्रकरणी ॲड.गुणरत्न सदावर्ते पोलीसांच्या ताब्यात

मुंबई:राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबई तील सिल्व्हर ओक निवासस्थानी आज दुपारी दगडफेक  आणि चप्पल फेक आंदोलन करून राडा केल्या प्रकरणी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी चार ते पाच पोलीस दाखल झाले असून, कोणतीही पूर्व नोटीस न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, चौकशीमध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

दरम्यान, घरा बाहेर पडताना आपली हत्या होऊ शकते असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जी कलमं दाखल झाली आहेत त्यामध्ये नोटीस देण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!