रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेकडून मंत्री उदय सामंत यांनी शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेतला..
रत्नागिरी शहरासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते भूमिपूजन कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विकास निधीसाठी एकनाथ शिंदेंकडे यांच्याकडे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी देण्याचा आग्रह धरला व शिंदे यांच्याकडून नगरपालिकेच्या इमारतींसह शहरातील अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर करून घेतला.
राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मतदार संघाकरिता एकनाथ शिंदे यांनी निधी द्यावा अशी मागणी करून तोही निधी देण्याचा आग्रह धरला त्यानंतर झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन देऊन निधी मंजूर केला.
सामंत यांनी शहरासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला व तसा अध्यादेशही नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे.