बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित,टिझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद,पहा व्हिडिओ

कच्चा लिंबू आणि हिरकणी या दर्जेदार सिनेमांनंतर दिग्दर्शक प्रसाद ओक आता नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा २९ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.या टिझरला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.दरम्यान प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. हा सिनेमा प्रेमकहाणीवर आधारित आहे.तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ या चित्रपटात पाहायला मिळत आहे.
या सिनेमाचा टिझर आज प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती असलेला हा सिनेमा सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.