महाराष्ट्रमुंबईराजकीय

ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्यातबाबत चर्चा झाली. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधाव सचिव नविन सोना आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी मोलाचे योगदान देत असून मुख्य फोकस पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर आमचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, अटल सेतू यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये मेडीसिटी, एज्युसिटी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे खासदार टिम वाट्स यांचे स्वागत करतानाच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबईची ओळख असलेला वडा पाव आग्रहाने खाऊ घातला. विशेष म्हणजे श्री. वॅटस् आणि त्यांच्या समवेत असलेले ऑस्ट्रेलियाचे पश्चिम भारतासाठीचे वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आनंदाने त्याचा स्वाद घेतला. वीस वर्षांपूर्वी आपण मुंबईत क्रिकेटचा समाना पाहण्यासाठी आलो होतो अशी आठवण वॅटस् यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!