कोंकण
प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष अजितकुमार देशपांडे यशदा पुणे येथे देणार राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण..!
सामान्य परिचर ते प्रशासन अधिकारी देशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास..

सिंधुदुर्गनगरी(राजन चव्हाण) प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.अजितकुमार देशपांडे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याना(सीईओ),त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये या विषयावर ‘ यशदा ‘ पुणे येथे मागर्दशन करणार आहेत.
गुरूवार दि.५ व ६ ऑगस्ट २०२१ असे दोन दिवस हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत गेले काही दिवस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद, लाड-पागे प्रकरणी सीईओं नी केलेली कारवाई, जि प च्या राज्यव्यापी संघटनेने या प्रश्नावर घेतलेली आक्रमक भूमिका,ग्रामविकास मंत्र्यांनी आदेश दिले असतांनाही ‘ सीईओ ‘ नी त्यांचे आदेश धुडकावीत केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर नेमके याच विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण होत आहे हा योगायोग म्हणावा लागेल.
सिंधुदुर्ग जि.प.चे ‘सीईओ ‘हे सुद्धा या प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी पुणे येथे रवाना झाले आहे.दरम्यान ही बाब राज्यातील सर्व कर्मचारी,अधिकारी आणि प्रशासन अधिकारी, लिपिक वर्ग,परिचर, यांच्यासाठी भूषणावह असल्याची माहिती प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्य प्रवक्ते संजय नलावडे यांनी दिली.
एक सामान्य परिचर ते प्रशासनात लिपीक ते प्रशासन अधिकारी म्हणून काम करीत अजितकुमार देशपांडे यांनी गारगोटी ते यशदा या प्रवासात अनेक कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, वर्ग -१ चे अधिकारी ,वरिष्ठ अधिकारी आदीना त्यांच्या ज्ञानात भर घालणारी व्याख्याने दिली आहेत.अनेक चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शन केले आहे.
एक सामान्य माणूस अचाट बुद्धीच्या जोरावरच इतका अभ्यास करून चक्क वर्ग -१ च्या अधिकाऱ्यांना,सनदी अधिकाऱ्यांना मागर्दशन करू शकतो ही गौरवशाली बाब आहे व संघटनेच्या दृष्टीने तितकीच भूषणावह आहे असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.