अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केला नवीन आलिशान फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क!

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. सतत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अक्षय कुमारने नुकतंच मुंबईत एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे. अक्षय कुमारने खरेदी केलेल्या या नव्या फ्लॅटची किंमत कोट्यावधी रुपये आहे.
स्क्वेअरफीटइंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने मुंबईत स्वतःसाठी एक आलिशान घर खरेदी केले आहे. अक्षय कुमारचे मुंबईतील हे घर खार पश्चिम या ठिकाणी आहे. अक्षय कुमारचा हा फ्लॅट खारमधील जॉय लिजेंड इमारतीत असून तो १९ व्या मजल्यावर आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
अक्षय कुमारने डिसेंबर महिन्यात अंधेरी पश्चिम येथे असणारे त्याचे ऑफिस विकले होते. याबदल्यात त्याला ९ कोटी रुपये रक्कम मिळाली होती. ही प्रॉपर्टी विकल्यानंतर त्याने हा नवा फ्लॅट खरेदी केला आहे. त्याच्या या नवीन फ्लॅटची किंमत ७ कोटी ८४ लाख रुपये इतकी असल्याचे बोललं जात आहे. या फ्लॅटसोबत त्याला चार वाहनांच्या पार्किंगसाठी जागाही मिळाली आहे.
यासाठी अक्षय कुमारला ३९ लाख २४ हजार इतकी रक्कम स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागली आहे. या अपार्टमेंटचा रेडी रेकनर दर हा ७ कोटी २२ लाख इतका असल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय कुमारने ७ जानेवारी २०२२ रोजी या घराच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.