मनोरंजन

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ होणार आज ओटीटीवर प्रदर्शित, इतक्या कोटी रुपयांमध्ये झाली डील

देशभर चर्चेत असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पण ३०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मने किती रुपयांना विकत घेतले असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

आजपासून ‘पुष्पा’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅमेझॉन प्राइमने ‘पुष्पा’ चित्रपटाचे हक्क तब्बल २२ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आयटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!