मोठी बातमी! वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची उपोषणाची घोषणा

मुंबई- गेल्या महिन्यात राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईट विक्रीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विविध स्तरांमधून विरोध देखील झाला होता. विरोधी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून या निर्णयाविरोधात काही ठिकाणी आंदोलने देखील झाली. दरम्यान आता या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाची घोषणा केली आहे.
येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत जर राज्य सरकारने राज्यातील वाइन विक्री संदर्भात घेतलेला निर्णय मागे घेतला नाही तर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केली आहे. अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारवर दबाव येण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्य सरकारने हा निर्णय शेतकरी हिताचा असल्याचं म्हटलं होतं.शेतकरी घेत असलेल्या द्राक्षाच्या आणि अन्य फळांच्या योग्य भाववाढीसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं जाहिर केलं होत.मात्र, आता अण्णानी केलेली उपोषणाला बसणार असल्याची घोषणा पाहून राज्य सरकार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.