ब्रेकिंग
ब्रेक द चेन: राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन वाढवला
मुंबई,दि.२९:राज्यात ३० एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मे नंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे.काल मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता,या बाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.
त्यानुसार आज जारी करण्यात आलेल्या आदेशात हे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. नव्या आदेशात नवीन कुठलीही सुधारणा करण्यात आली नसून ब्रेक द चेन नियमांतर्गत दि.१३, व २१ एप्रिल २०२१ रोजी जारी करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Break The Chain Order Dated 29. 04.2021