शिंदे सरकारच्या मंत्र्यांना अनेक आघाड्यांवर अडचणी ?
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्योगमंत्री उदय सामंतांनी सरकारच्या कारभाराविषयी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

मुंबई: महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला, तरी वास्तव वेगळेच असल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची विविध आघाड्यांवर कोंडी होत असून, भाजपने शिंदे गटाला अप्रत्यक्ष धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. सरकारला अवघे दोन महिने पूर्ण होत असताना मंत्र्यांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्योगमंत्री उदय सामंतांनी सरकारच्या कारभाराविषयी पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. एमआयडीसी संदर्भातील निर्णय अधिकारी प्रशासकीय पातळीवर घेत असल्याचं सामंतांनी सांगितलंय. त्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. सामंतांच्या पत्रात नेमकं काय? मंत्र्यांना डावलून एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे धोरणात्मक निर्णयएमआयडीसीच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिकाऱ्यांकडून परस्पर कपातउद्योग विभागाच्या अनेक निर्णयांचं अधिकाऱ्यांकडून केंद्रिकरणशिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याबाबत आदेश न निघणे, मंत्र्यांच्या फाईल्स अडवून धरल्याची चर्चा रंगलीय.. एवढंच नाही तर मुख्यमंत्री कार्यालय शिंदे गटाला वारंवार धक्के देत असल्याचंही समोर आलंय.. ते नेमकं कसं? पाहूयात. शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी? एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द करुन पहिला धक्काएस
एसटी महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करुन सरनाईकांना झटकाआपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना डावलून दादांना झुकतं मापमंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्याएमआयडीसी विभागात मंत्र्यांना बायपास करुन अधिकाऱ्यांचे निर्णयमहायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली महत्वाकांक्षा कायम ठेवत मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.. त्यानंतर गृह खातं आणि पालकमंत्रिपदावरुन शिंदेंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.. त्यामुळेच सीएमओकडून शिंदेंची कोंडी केली जातेय का? याची चर्चा रंगलीय.. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेऊन ही कोंडी फोडणार की महायुतीतील दरी आणखी वाढत जाणार? याकडे लक्ष लागलंय.