‘आम्हाला उल्लू बनवता का? म्हणत मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलील यांनी लगावला मालिकांना टोला

मुंबई- राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्धा तापताना दिसून येत आहे. त्यातच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला तरी तो पुढे जाऊ शकत नसल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. त्यांच्या याच प्रतिक्रियेवर उत्तर देताना, आरक्षणावरून मुस्लिमांना उल्लू बनवण्याचं काम सुरू असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, नवाब मलिक यांनी विधानसभेत दिलेली माहिती म्हणजे, मुस्लिमांना उल्लू बनवण्याचा धंदा आहे. मलिक म्हणतात पाच टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत आम्ही विचार करत असल्याचे म्हणत आहे. पण आमचं म्हणणं आहे की, हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ठाकरे सरकार शिक्षणाबाबतचं आरक्षण का लागू करत नाही?, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, कोर्टाने दिलेला निर्णय हे सरकार लागू करत नाहीये आणि मुस्लिमांना उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. २०१४ मध्ये कोर्टाने मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याचं सांगितले होते. त्यासाठी आणखी किती दिवस लागणार? असा सवाल जलील यांनी केला. सत्तेत असताना सुद्धा जर निर्णय घेत नसाल तर मुस्लिम समाजाला आता सर्व काही कळत असल्याचा टोला जलील यांनी मालिकांना लगावला.