भारतीय सैन्याचा ‘फॅन्टम’ श्वान चकमकीत शहीद

जम्मू – जम्मू-काश्मिरातील अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दुर्दैवाने या चकमकीत भारतीय सैन्याचा फॅन्टम नामक बहादूर श्वान शहीद झालाय. अखनूर सेक्टरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला केला होता. या अमानवीय कृत्यानंतर दहशतवाद्यांना संपवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. सैनिकांनी सोमवारी संध्याकाळी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर मंगळवारी सकाळी आणखी एक दहशतवादी ठार करण्यात आला. भारतीय केलेल्या कारवाईत विशेष पथक, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) कमांडोंनी सहभाग घेतला. हेलिकॉप्टर आणि ड्रोनने या मोहिमेत महत्त्वाचे सहकार्य केले. पण दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात फॅन्टम शहीद झाला. फॅन्टम हा श्वान बेल्जियम मेलिनो जातीचा होता आणि त्याचे वय 4 वर्षं होते.भारतीय लष्कराने एक्स पोस्ट करत फॅन्टमला श्रद्धांजली वाहिली आहे. “फॅन्टमने सर्वोच्च बलिदान दिले आहे, आम्ही त्याला नमन करतो. दहशतवाद्यांविरोधातील ही मोहीम संपण्याच्या मार्गावर होती, त्याच वेळी फॅन्टम जखमी झाली. त्याचे धाडस आणि प्रामाणिकपणा कधीही विसरता येणार नाही,” असे लष्कराने म्हटले आहे.