आर्यन खानला क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

मुंबई:- गेल्या अनेक दिवसांपासून टीव्ही विश्वात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे आर्यन खान. याच सिनेअभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
त्यानंतर दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचं बंधन जामिनातील अट म्हणून घालण्यात आलं होतं. आता त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला सूट दिली असून दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.
या संदर्भातील याचिका आर्यन खाननं न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. या न्यायालयाच्या आदेशामुळे आर्यन खान याला आणि संपूर्ण खान कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने आर्यन खानसाठी मोठे जिखरीचे गेले.या दोन महिन्यांच्या दरम्यान आर्यन खान हा एनसीबीच्या कोठडीत होता.यानंतर दिवाळीच्या धर्तीवर त्याला जामिन मंजूर करत दर शुक्रवारी एनसीबी कार्यलयात हजर राहावे लागेल या अटीसह सोडून देण्यात आले होते. मात्र,आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आर्यन खानला दिलासा मिळाला आहे.