महाराष्ट्रमुंबईराजकीय

भरारी पथकाची कारवाई, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलीस व भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्यामध्ये, आदर्श आचारसंहिता लागल्यापासून कोट्यवधी रुपये आणि मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका एटीएम मशिनसाठी नेण्यात येणारी कारही पोलिसांनी जप्त केली होती. रात्री उशिरा ही कार एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यास आल्याने पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर, आता नालासोपारा विधानसभेत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. सदर व्हॅन नालासोपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, या रकमेचा हिशोब मिळत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत.

अहवालानुसार, या एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये आहेत, परंतु या रकमेचा नेमका हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे. त्यावरून पोलिस आता तपास करत आहेत की ही रक्कम एटीएमसाठी होती, की निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार होती. सदर प्रकरणावर पुढील तपास सुरू असून, व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी व्हॅनमधील बॅगांमध्ये असलेली रक्कम जप्त केली आहे. तर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी 80 लाख एवढी रोख रक्कम कॅश व्हॅनमध्ये सापडली आहे. निवडणूकांच्या आचारसंहितेचा कॅश संदर्भात असलेली नियमावली पाळत नसल्याने, पोलिसांनी कॅश व्हॅन ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!