ब्रेकिंग

प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

पेनसिल्वेनिया- अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार रॅलीत हल्ला करण्यात आला. पेन्सिलवेनिया या राज्यातीत प्रचार रॅलीत हा प्रकार झाला. एका नंतर एक गोळीबाराचे आवाज आले. व्हिडिओत ट्रम्प यांच्या कानावर रक्त दिसत आहे. तर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घटनास्थळावरुन तातडीने बाजूला दूर करण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ माजी राष्ट्राध्यक्षाने त्यावेळी वेदना लपविण्यासाठी मूठ आवळली.

पेन्सिलवेनियामधील बटलरमध्ये निवडणूक रॅलीमध्ये ते निवडणूक प्रचार करत होते. त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांनी उजव्या कानवर हात ठेवला. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या भोवती कडे केले. त्यावेळी एकच गडबड उडाली. लोक इकडून तिकडे पळाले. काही जण जमिनीवर झोपले. या रॅलीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचवेळी परिसर गोळ्यांच्या आवाजांनी भरुन गेला. ट्रम्प यांनी त्यांच्या कानाला हात लावला. त्यावेळी रक्त वाहत होते. पोडियमच्या मागे त्यांना आश्रय घेतला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना कडे केले. त्यावेळी बाजूला व्हा, बाजूला व्हा म्हणून सुरक्षा रक्षक ओरडत होते.

या गोळीबाराच्या प्रकारामुळे उपस्थित गर्दीत एकच धांदल उडाली. तर त्यांच्या आजूबाजूची अनेक जण जमिनीवर झोपले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना कडे करुन बाजूला नेले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसले. त्यांनी हवेत मूठ आवळत काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला. काहींना ते वेदना लपवत असल्याचे वाटले तर काहींनी घाबरू नका, आपण मागे हटणार नाही, यासाठीचा तो निर्धाराचा संकेत असल्याचे वाटले.

गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्म्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या सुरक्षेत तैनात अमेरिकन सुरक्षा रक्षक आणि सर्व सुरक्षा यंत्रणांचे आभार मानले. बटलर येथील गोळीबाराच्या घटनेनंतर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी लागलीच पाऊल टाकल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रचार रॅलीत मारलेल्या व्यक्तीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. त्याच्या कुटुंबियाविषयी संवेदना व्यक्त केली. आपल्या उजव्या कानाला गोळी चाटून गेल्याचे त्यांनी सांगितले. हा हल्ला कुणी आणि का केला याची माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!