राज्य सरकारचा “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” उपक्रम
आदिवासी समाजातील २६ आमदार, ४ खासदार थेट आश्रमशाळांमध्ये राहून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार

राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांसाठी “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या, गरजा आणि सुधारणा याचा आढावा घेणार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुक्कामी राहणार आहेत. राज्यभरातील २६ आमदार आणि ४ खासदारही स्थानिक पातळीवर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
या उपक्रमाद्वारे शिक्षणाच्या सुविधा, वसतिगृहांची स्थिती, अन्न व पोषण, आरोग्य व्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यावर त्वरित उपाययोजना केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे.
“एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम फक्त पाहणी करण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रभावी निर्णयघेण्यात येतील.