आपला जिल्हागोरेगाव मिरर

आमदार सुनील प्रभूंच्या प्रयत्नांमुळे दिंडोशीत सोसायट्यांमधून धोकादायक जैविक कचरा संकलनाचा उपक्रम सुरु..

आकांक्षा बिल्डिंग त्रिवेणी नगर परिसरात कचरा संकलन पेट्या करून दिल्या उपलब्ध

मुंबई: वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यात घनकचऱ्याचे एकत्रिकरण व त्याची विल्हेवाट ही एक पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे. लोक सहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. घनकचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. याकरिता घरगुती सुका कचरा व ओल्या कचऱ्या सोबतच घरगुती जैविक धोकादायक कचरा विलीगीकरण करण्यात यावा या करिता गृहनिर्माण सोसायटयांनी त्यांच्या पातळीवर विलगिकरण करावे व विल्हेवाट लावावी याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील कृती योजना तयार केली आहे. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आकांक्षा बिल्डिंग त्रिवेणी नगर परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अशा प्रकारे घरगुती जैविक धोकादायक विलगिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सहकारी गृहनिर्माण संस्थेला शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली आमदार, मुख्य प्रतोद, माजी महापौर मुंबई, सुनिल प्रभु यांनी घरगुती जैविक धोका दायक कचरा विलगिकरण उपक्रमाकरिता घरगुती जैविक धोका दायक कचरा संकलन पेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संस्थेने घेतलेला निर्णय अतीशय स्तुत्य असून इतर सहकारी गृहनिर्माण संस्थाकरिता एक मार्गदर्शक कृती योजना (रोड मॅप) होऊ शकेल अशा शब्दात आमदार सुनिल प्रभु यांनी संस्थेच्या निर्णयाचा गौरव केला व आपला हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सोबत आहे असे भक्कम आश्वासन दिले.

यावेळी, विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभाग प्रमुख गणपत वारिसे, शाखा प्रमुख रामचंद्र पवार, शाखा संघटक कृतिका शिर्के, महापालिका सहाय्यक अभियंता म्हस्के, अजय शिंदे, संजय बिरे, संस्थेचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!