महाराष्ट्रमुंबई

औरंगजेबा च्या कौतुकानंतर आता अबू आझमी ची माघार- वक्तव्य मागे घेतो

मुंबई : ‘मी माझं वक्तव्य मागे घेतो’, असं अबू आझमी यांनी म्हटलय. मी संभाजी महाराजांचा कुठलाही अपमान केलेला नाही असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. तर माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. कुणाला वाईट वाटलं असेल तर वक्तव्य मागे घेतो असं अबू आझमी यांनी म्हटलंय. दरम्यान, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी काल म्हटलं होतं. तर त्याने अनेक मंदिरे बनवली. तर संभाजी महाराज यांनी कधी धर्मासंदर्भात कधीच कोणतीही लढाई लढली नाही, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला होता. मात्र आता आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मी कोणाचाही अपमान केलेला नाही, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असोत, छत्रपती संभाजी महाराज असोत, डॉ. भीमराव आंबेडकर असोत, महात्मा ज्योतिबा फुले असोत, राजश्री शाहू महाराज असोत, अशा सर्व महापुरुषांचा आम्ही आदर करतो आणि संपूर्ण देशाने आमचा आदर केला पाहिजे, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय तर ते असंही म्हणाले, इतिहासकाराच्या पुस्तकातील विधानाच्या आधारे मी औरंगजेबाचे कौतुक केले आहे. मी कधीही कोणत्याही महापुरुषाबद्दल, मग ते संभाजी महाराज असोत किंवा शिवाजी महाराज असोत, एकही चुकीचा शब्द बोललेला नाही. पण जर या गोष्टींमुळे एखाद्याला असे वाटत असेल की हे विकृत पद्धतीने सादर करून, मी काहीतरी चुकीचे बोललो आहे, तर मी माझे संपूर्ण विधान मागे घेतो’, असं म्हणत अबू आझमी यांनी यु-टर्न घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!