महाराष्ट्रक्राइम

संरक्षण मंत्रालय भू-दलाचा ‘आय ए एस अधिकारी’ असल्याचा बनाव करणाऱ्या फसवेखोराला अटक

सातारा : मी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाचा थलसेनेचा आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून एक तरुण गुहागर तालुक्यातील जानवळे गावांमध्ये काही दिवस फिरत होता. मात्र तो अचानकच लोकांना शिवीगाळ व धमकी देऊ लागल्याने लोकांना त्याचा संशय येऊ लागला. लोकांनी लगेच गुहागर पोलिस ठाण्याशी संपर्क करून याबाबत माहिती पोलिसांनी दिली.

गुहागर पोलिस ठाणे येथे कार्यरत असणान्या स्वामिनी नाटेकर या महिला पोलिस नाईक यांनी तशी फिर्याद दिली असून, संशयित आरोपीं प्रथमेश शांताराम येवले (वय २५, मूळ ता. खटाव, जि. सातारा, जानवळे, ता. गुहागर) याच्यावर बनावट आयपीएस या पदाचे ओळखपत्र तयार करून लोकांना शिवीगाळ करून धमकवल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

प्रथमेश येवले या तरुणांने आयएसआय या पदाचे बनावट व पत्र तयार करून १७ मे रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते आजतागायत जानवळे गावातील अनंत नंदन पार्क या सोसायटीमध्ये राहणारे अनिल रहाटे, राम गोंदा, भीमराव सपकाळ व अन्य काही रहिवाशांना मी आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून शिविगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी या बनावट आयएएस अधिकारी प्रथमेश येवले याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३३६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेचा अधिक तपास गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक निरीक्षक भोपळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!