रत्नागिरी : एमआयडीसीच्या पाली विश्रामगृहाचे भूमिपूजन
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज भूमिपूजन

रत्नागिरी – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाली येथील विश्रामगृहाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज भूमिपूजन झाले. याप्रसंगी एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, बाबू म्हाप, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष घाडगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विविध औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आली आहेत. महामंडळाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाली येथे अद्ययावत विश्रामगृह बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागा हस्तांतरित करण्यात आली. तेथे नवीन अद्यावत विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७७.०० चौ.मी. आहे. प्रस्तावित विश्रामगृह दुमजली असून त्यामध्ये १ अतिमहत्त्वाचा कक्ष व ४ सर्वसामान्य कक्ष आहेत. अतिथींकरिता प्रतीक्षा जागा, भांडारगृह, स्वयंपाकगृह, जेवणाची खोली, प्रसाधनगृह, युटीलिटी खोलीचा समावेश आहे.