तेजस्विनी प्रकाश बनली बिग ‘बॉस सिझन १५’ची विजेती

मुंबई- कलाकारांसह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो आहे.याच बिग बॉसचा या सिझनचा शेवटचा भाग नुकताच प्रदर्शित झाला.यंदा बिग बॉस हिंदीचं १५ वं पर्व सुरु होतं. यंदाच्या १५ व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
अखेर काल बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.
काल बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा रंगला. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वच स्पर्धकांनी नृत्याविष्कार करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.