Big Breaking:शिवसेनेत मोठे बंड! नाराज मंत्री एकनाथ शिंदे 24 आमदारांसह गुजरात मध्ये..
ठाण्यातले २ तर कोकणातले ४ आमदार सोबत

मुंबई:राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलेला आहे.. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस जाहिर झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व सेनेचे बडे नेते असलेले एकनाथ शिंदे हे नाराज असून सेनेच्या २४ आमदारांसोबत गुजरात ला ली-मेरिडीअन हाॅटेल ला पोहोचले आहेत.
या घटनेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली असून मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली.
सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपास च्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.






