ब्रेकिंग

मोठी बातमी! छातीत दुखू लागल्याने नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं

सिंधुदुर्ग:-शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला नेण्यात आले आहे.दरम्यान आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार होती.मात्र,राज्य सरकारने आज लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना कोल्हापूरला नेलं जात आहे. रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना घेऊन पोलीस कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

नितेश राणे यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्याच दिवसापासून छातीत दुखू लागलं होतं. रुग्णालयात योग्य ह्रदयरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेतला होता. पण साखर कमी झाल्याने तसंच मणक्याचा त्रास यामुळे त्यांना तातडीने हलवण्यात आलं नव्हतं.

पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात आलं असून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नितेश राणे यांच्यासोबत पोलिसांचं आणि डॉक्टरांचं पथकही रवाना झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!