रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या असे करा चेक

मुंबई – रेशनकार्ड हे सरकारने नागरिकांना दिलेले महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज केवळ गरिबांना अनुदानित रेशन देत नाही तर ओळखीसाठी देखील वापरला जातो. नागरिकत्वाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यासाठीही याचा वापर केला जातो. शिधापत्रिकाधारकांना गहू, साखर, तांदूळ, रॉकेल इत्यादीच्या खरेदीवर यामुळे सवलत मिळते. काही महिन्यांपासून या रेशनकार्डच्या आधारे यूपी, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये गरीब कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे.
जनधन खाते उघडण्यापासून ते ओळखपत्र म्हणून रेशनकार्डचा वापर केला जातो. जर कोणाकडे आधार कार्ड नसेल तर तो अनेक ठिकाणी रेशन कार्ड वापरू शकतो. परंतु काहीवेळा विविध कारणांमुळे शिधावाटप यादीतून नाव काढून टाकले जाते, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: रेशनकार्डच्या यादीतून तुमचे नाव काढून टाकण्यात आल्याचे तुम्हाला माहीतही नसते. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डमधील नाव कसे तपासायचे ते सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला NFSA च्या वेबसाइटवर जावे लागेल.
याप्रमाणे यादीत तपासा तुमचे नाव-
१) रेशनकार्ड यादीत तुमचे नाव कापले गेले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx ला भेट द्या.
यानंतर रेशन कार्डचा पर्याय निवडा.
२) आता Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा. यानंतर राज्य आणि जिल्हा निवडा.
३) जिल्ह्यानंतर ब्लॉकचे नाव टाका, त्यानंतर पंचायतीचे नाव निवडा.
४) आता रेशन दुकानाच्या दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार निवडा.
५) यानंतर तुमच्या समोर नावांची यादी येईल, जी शिधापत्रिकाधारकांची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव या यादीत पाहू शकता.






