मुंबई

विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुतीच्या असंतुष्ट नेत्यांना महामंडळांचं वाटप,  मंत्रीपदाचा दर्जा!

मुंबई – विधानसभा निवडणूक जेमतेम महिनाभरावर आली असताना शिंदे सरकारकडून असंतुष्ट नेत्यांना महामंडळांचं वाटप करण्यात आल्याचे  समोर आले आहे. विशेष म्हणजे महामंडळ वाटपात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना झुकत माप देण्यात आले आहे. या यादीत अजित पवार गट एकाही नेत्याची वर्णी लागली नसल्यांचे सांगण्यात येत आहे.

भाजप शिवसेनेच्या मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या बड्या नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप करण्यात आल आहे.. वाटप झालेल्या महामंडळात  भाजपचे प्रवक्ता धर्मपाल मेश्राम यांना मागासवर्गीय आयोग  उपाध्यक्ष पद देण्यात आल आहे.  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील कुणाचंही नाव समोर आलं नाही.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. संजय शिरसाट गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते. अखेर विधानसभा निवडणुकीच्याआधी त्यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले नांदेडचे माजी खासदार हेमंत पाटील यांनादेखील महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेमंत पाटील यांनी ही मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्य सरकारच आभार मानतो कि मला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. मी गेल्या अनेक वर्षांपासून हळद पिकावर काम करत आहे. याची दखल घेऊन मला हे पद देण्यात आलं. माझं राजकीय पुनर्वसन व्हायचं बाकी आहे. विधानसभेसाठी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!