ब्रेकिंगकोंकणमहाराष्ट्रमुंबई
चला दापोली, २६ मार्चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया-किरीट सोमय्या
ट्विट करून जाहिर केलं

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली होती.त्यानंतर बरेच दिवस शांत राहिल्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केलंय. त्यांच्या या ट्वीटने खळबळ उडाली आहे.
‘चला दापोली, २६ मार्चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया,’ असं सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. त्यामुळे सोमय्या २६ मार्चला दापोलीला जाणार असल्याचं निश्चित झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या सातत्याने अनिल परबांवर आरोप करत आहेत.