ब्रेकिंग
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज पार पडणार महत्त्वाची सुनावणी; अटक होणार की दिलासा मिळणार याकडे राज्याचं लक्ष

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा आरोप असलेल्या आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांना शरण येण्यास दहा दिवसांची मुदत दिली होती.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानुसार, नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले.दरम्यान शुक्रवारी सरकारी वकिल गैरहजर असल्याने त्यांच्या जामीनावर सुनावणी होऊ शकली नाही.त्यामुळे आज नितेश राणेंच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दरम्यान आज ही सुनावणी होत असताना आमदार नितेश राणेंना अटक होणार की दिलासा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.संपूर्ण राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.