महाराष्ट्रकोंकणमुंबई

दापोली विधानसभा मतदारसंघ फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच – अमोल किर्तीकर

दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघ हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे. तो यापुढे देखील राहील, असा ठाम विश्वास अमोल किर्तीकर यांनी वाकवली येथील शिवसैनिकांच्या सभेत बोलताना व्यक्त केला. शिवसेना उपनेते आणि युवासेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाला उभारी देण्यासाठी दापोली, मंडणगड, खेड तालुक्यात दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या शुभारंभाची सुरुवात खेड शहरातून सुरू झाली.

दुसरी सभा दापोली तालुक्यातील वाकवली येथे टेटवली पंचायत समिती गणाचे उपविभाग प्रमुख संदिप जाधव यांच्या निवासस्थानाच्या अंगणात पार पडली. यावेळी दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, खेड तालुका प्रमुख दत्ता भिलारे, दापोली तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, खेड नगरपरिषदचे तत्कालीन गटनेते बाळा खेडेकर, टेटवली विभाग प्रमुख रवींद्र घडवले, उपविभाग प्रमुख संदिप जाधव, वाकवली शिवसेना शाखाप्रमुख सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!