ज्या पायरीवर शिवसैनिकांनी सोमय्यांना पाडलं त्याच पायरीवर भाजपा सोमय्यांचा सत्कार करणार,परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

पुणे:- शिवसेना खासदार संजय राऊत यांना खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसैनिकांनी पुण्यामध्ये किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली होती.दरम्यान ते पायरीवरून खाली पडले.यावेळी किरीट सोमय्या जबर दुखापत झाल्याचं सांगत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण पण मोठ्या प्रमाणात तापलं होतं.
अश्यात आता पुन्हा एकदा शिवसैनिकांनी ज्या पायरीवर किरीट सोमय्यांना पाडलं,त्याच पायरीवर किरीट सोमय्यांचा सत्कार करणार असल्याचा चंग भाजपने बांधला आहे.येत्या ११ तारखेला त्याच पायरीवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सत्काराची घोषणा करून भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान याच धर्तीवर हा प्रकार ज्या पुणे महानगरपालिकेचे पायरीवर घडला.त्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये व भाजपच्या कोणत्याही नेत्याला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये. यासाठी पोलीस सावधानता बाळगून आहेत.