BMW ने लाँच केली रंग बदलणारी कार, एका सेकंदात बदलते रंग,पहा व्हिडीओ

तुम्ही रंग बदलणारा सरडा पाहिला असेल पण कधी रंग बदलणारी गाडी पाहिली आहे का? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारा तर तुम्ही सपशेल नकार द्याल,पण आता हे सत्यात उतरवत बीएमडब्लूने रंग बदलणारी चक्क गाडी तयार केली आहे.तुम्ही द्याल त्या कमांडनुसार ही गाडी रंग बदलते आणि ते ही अवघ्या काही सेकंदात.
https://youtu.be/ZhQhJZRzVrM
अमेरिकेतल्या लागवेसा शहरात सध्या सर्वात मोठा इलेक्ट्रिक शो सुरू आहे.या शोमध्ये बीएमडब्लूने सादर केलेली ही कार सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.खरंतर एका बटनावर रंग बदलणारी ही जगातली पहिली कार आहे.विशेष म्हणजे ही पूर्णपणे ऑटोकार आहे.
सध्या तरी ही गाडी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.ही गाडी बाजारात येण्यासाठी २०२४ हे वर्ष उजाडणार आहे.कोणत्या रंगाची गाडी घेऊ या विचाराने गोंधळलेल्या व्यक्तींसाठी ही गाडी वरदान ठरणार आहे.या गाडीची किंमत जवळपास ५ कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.